Tue. Nov 24th, 2020

प्रीतम मुंडेंच्या प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर!

‘बीड जिल्हातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी’ या प्रितम मुंडेंच्या वक्तव्यावर स्मृती ईराणींनी संसदेत चक्क मराठीतून दिलं. मराठावाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न प्रीतम मुंडेंनी लोकसभेत केला. यावर स्मृती ईराणींनी मला मराठी येतं. शेतकऱ्यांच्या समस्या माहीत आहेत त्यामुळे त्यांना नक्कीच मदत करण्यात येईल असं उत्तर दिलं.

संसदेत गाजलं स्मृती इराणींचं मराठी

बीडच्या खासदार प्रीतम मुंडेनी बीड जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी अशी मागणी लोकसभेत केली.

यावर स्मृती इराणींनी मराठीतून उत्तर दिलं.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या आपल्याला माहीत आहेत.

त्यांच्यासाठी आपण मदत करणार असल्याचं स्मृती इराणींनी यावेळी सांगितलं.

स्मृती इराणींनी प्रीतम मुंडेना मराठीतून दिलेले हे उत्तर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

मराठवाड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, कधी कमी पावसामुळे तर दर मिळत नसल्याने हे शेतकरी अडचणीत सापडतात.

या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत मिळावी अशी मागणी मुंडेंनी लोकसभेत केली. त्यावर स्मृती इराणी म्हणाल्या त्यांना मराठी येतं. परंतु मुंडेंनी इंग्रजीत बोलण्याचा निर्णय देखील चांगली गोष्ट आहे.

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वस्त्रोद्योग खाते मदत करण्यास तयार आहे. यासाठी प्रीतम मुंडेंनी वस्त्रोद्योग मंत्रालायाच्या संपर्कात राहण्याचं स्मृती इराणींनी म्हटलं.

स्मृती इराणीं यांच्य़ाकडे महिला व बालकल्याणसह वस्त्रोद्योग मंत्रालय खातं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *