Wed. Jun 23rd, 2021

स्मृती इराणींचा दीपिकावर हल्लाबोल

दिल्लीच्या JNU वरील हल्ल्याविरोधात देशातील सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. या हल्ल्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदूकोण JNU गेल्यामुळे त्यावरून नेटकऱ्यांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी दीपिकावर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाल्या स्मृती इराणी?

दीपिका पदुकोण कोणत्या राजकीय पक्षाची समर्थक हे आपल्याला माहिती आहेच. 2011 मध्ये दिपीकाने मी काँग्रेस समर्थक आहे, असं सांगितलं होतं.
‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणाऱ्या ‘तुकड तुकडे गॅंग’च्या लोकांबरोबर उभं राहण्याचा दीपिकाला अधिकार आहे, असा टोमणा स्मृती इराणी यांनी लगावला.
ज्यांनी लाठ्या काठ्या घेऊन मुलींच्या गुप्तांगावर हल्ले केले, अशा लोकांच्या बाजूने दिपीका उभी राहिली आहे.

संबंधित बातमी- प्रेग्नंसीबद्दल विचारल्यावर दीपिका म्हणते …

जेएनयू हल्ल्याबाबत विचारले असता, स्मृती इराणी यांनी तपास चालू असताना यावर बोलणे बरोबर नाही. मी घटनात्मक पदावर आहे. पोलिसांचा तपास पूर्ण होऊन त्याची तथ्ये कोर्टासमोर मांडेपर्यत मी काही बोलणे योग्य ठरणार नाही. असे त्या म्हणाल्या.

दिपिकाचा ‘छपाक’ सिनेमा रिलिज होणार असल्याने JNU मध्ये जाणं हा तिचा पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका तिच्यावर एका गटाकडून होत आहे. तिच्या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणीही केली जात आहे. त्याचवेळी दुसरा गट मात्र तिच्या धाडसाचं कौतुक करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *