Jaimaharashtra news

मराठमोळया स्मृतीची टी२० मध्ये सर्वोत्तम कामगिरी

भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विशेष कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आयसीसी महिलांच्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत सर्वोच्च तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत मानधनाने भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. दुखापतीमुळे मालिकेत खेळु न शकलेल्या हरमनप्रीतचे दोन स्थानांचे नुकसान झाले आहे.

मानधनाने तीन सामन्यांच्या या मालिकेत एकूण ७२ धावा जमवल्या. त्यामुळेच तिच्या क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा झाली आहे. तिच्या खात्यात ६९८ गुण आहेत.

या क्रमवारीत भारताची जेमिमा रॉड्रिग्ज ६७२ गुणांसह सहाव्या, तर हरमनप्रीत कौर नवव्या स्थानी आहेत. स्मृतीचे हे कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान आहेचं तर वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत ती अग्रस्थानी आहे.

भारताची  ट्वेन्टी-२० मालिकेत विशेष कामगिरी

गोलंदाजांमध्ये राधा यादव हिची पाचव्या स्थानी मजल

एकता बिश्त हिने ५६वे स्थान प्राप्त केलं

अनुजा पाटील हिने ३५व्या क्रमांकावरून ३१व्या स्थानी झेप

इंग्लंडच्या डॅनियल वॅट हिनेही कारकीर्दीतील सर्वोत्तम १७वे स्थान

वॅट हिने या मालिकेत १२३ धावा

टॅमी ब्यूमाँट आणि कर्णधार हीदर नाइट यांचेही अनुक्रमे २६वे आणि ३३वे स्थान

 

 

 

Exit mobile version