Fri. May 7th, 2021

विद्यार्थ्यांच्या ‘पोषक’ आहारात ‘शिजवलेल्या सापाची खिचडी’!

आजपर्यंत आपण जिल्हा परिषदेच्या शाळेतील गलथान कारभारामुळे खिचडीत पाल, उंदीर,  मांजर पडून विषबाधा झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. मात्र, नांदेड जिल्ह्यातील शाळेच्या खिचडीत चक्क साप शिजल्याने एकच खळबळ उडालीय. हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय.

काय घडलं नेमकं?

खिचडी खात असताना एका विद्यार्थ्यांच्या ताटात हा साप अढळला.

विद्यार्थ्यांने शिक्षकांना ही बाब सांगताच विद्यार्थ्यांना खिचडी न खाण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला.

त्यानंतर खिचडीची विल्हेवाट लावली.

विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितलं.

हाच का पोषक आहार?

दरम्यान, शाळेच्या गलथान कारभारावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केलीय.

घटनेची माहिती मिळताच नांदेड च्या शिक्षण विभागाचे पथक शाळेत दाखल झाले आणि आता चौकशी सुरू केलीय.

जिल्हा परिषद शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात आत्तापर्यंत अनेक समस्य़ा उद्भवल्या आहेत.

या भोजनात कधी किडे आढळून आले, तर कधी पाली… त्यामुळेच अनेकदा विषबाधेच्याही घटना घडल्या आहेत.

मात्र अन्नात चक्क सापच शिजलेला आढळून आल्याने आता या माध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

अन्नपदार्थ नीट प्रकारे स्वच्छ केले जात नाहीत. तसंच ते जिथे साठवले जातात, त्या जागेत किंडे, मुंग्या, घुशी यांचा वावर असतो. अशा पार्श्वभूमीवर माध्यान्ह भोजन खरोखर पोषक आहे का, असा प्रश्न विचारला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *