Wed. Aug 10th, 2022

बाप रे बाप… VVPAT मशीनमधून निघाला साप!

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना केरळमधील एका मतदानकेंद्रावर मात्र मतदान थांबवण्याची वेळ आली. ना तेथे कोणती घातपाताची कारवाई घडली, ना Booth Capturing सारखी घटना घडली होती, ना मशीनमध्ये कोणताही बिघाड झाला होता. VVPAT मशीनमधून चक्क साप निघाल्यामुळे मतदान थांबवण्यात आलं होतं.

केरळमधील कन्नूर मतदारसंघात वेगळाच प्रकार घडला.

येथील मय्यिल कंदक्कई मतदानकेंद्राच्या बूथवर VVPAT मशीनमधून साप निघाल्याने एकच गोंधळ माजला.

लोकांमध्ये घबराट पसरली.

लोक साप पाहून मशीनजवळ जायलाच तयार होईना.

खरंतर हा साप लहानसाच होता.

मात्र काही वेळासाठी या सापामुळे मतदान थांबून गेलं.

लोक मशीनपाशी जायलाच तयार होत नव्हते.

अधिकाऱ्यांनीही काहीवेळासाठी मतदान थांबवण्याचा निर्णय घेतला.

थोड्यावेळाने सापाला तिथून बाहेर काढण्यात आलं.

त्यानंतर पुन्हा मतदान सुरू झालं.

केरळमध्ये लोकसभेच्या 20 च जागा असल्यामुळे एकाच टप्प्यात येथील मतदान संपणार आहे. UDF, LDF आणि BJP हे येथे प्रमुख पक्ष आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.