Mon. Aug 15th, 2022

मुंबई महापालिकेत आतापर्यंत ५७ लाचखोर कर्मचारी बडतर्फ

२००५पासून ऑगस्ट २०२१पर्यंत बीएमसीचे ५७ कर्मचारी भ्रष्टाचार प्रकरणी निलंबित किंवा बडतर्फ झाले आहेत. यातील ५३ जण भ्रष्टाचार विरोध पथकाने (एसीबी) टाकलेल्या धाडींमध्ये सापडले, तर ३ जण बेहिशोबी संपत्ती बाळगल्याने सापळ्यात अडकले. याशिवाय एक प्रकरण थेट गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचाराचेही आहे.

एसीबीच्या धाडींमध्ये सापडलेल्या कर्मचाऱ्यांना बीएमसीने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये बडतर्फ केले आहे. यात बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी २०० रुपयांपासून १ लाख ७५ हजार रुपयांपर्यंतची लाच मागितल्याचे उघड झाले आहे. आरटीआयनुसार एका प्रकरणात एका शिक्षकाने प्रमाणपत्राची दुय्यम प्रत देण्यासाठी २०० रुपये घेतले, तर अन्य एका प्रकरणात बीएमसी अधिकाऱ्याने अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेतल्याचे समोर आले आहे.

२००५ ते २०२१ सालापर्यंतच्या बीएमसीमधील लाचखोर कर्मचाऱ्यांची माहिती समोर आली असून मुंबई पालिकेतील आतापर्यंत ५७ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असल्याचे माहितीच्या अधिकारातून जितेंद्र घाटगेंद्वारे माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.