Wed. Jun 16th, 2021

KBC मधील ‘या’ प्रश्नामुळे सोनाक्षी झाली ट्रोल

पंरतु २० सप्टेंबरचा एपिसोड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हामुळे आणखी चर्चेत राहिला. तिला एका साध्या सोप्या प्रश्नांचे उत्तर देता आले नाही. म्हणून आता तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

दबंग सिनेमानंतर सोनाक्षी सिन्हाने प्रेक्षकांच्या मनावर  आपली छाप सोडली.  सोनाक्षी सिन्हा आपल्या आभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. पंरतु आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ चा 11 वा सीझन सुरु आहे. यात एका प्रश्नामुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चांगलीच चर्चेत आली आहे.

२० सप्टेंबरचा एपिसोड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हामुळे आणखी चर्चेत राहिला. तिला एका साध्या सोप्या प्रश्नांचे उत्तर देता आले नाही.यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

हॉट सीटवर बसलेल्या राजस्थानच्या रुमा देवीच्या मदतीसाठी सोनाक्षी सिन्हा  kBC  11 च्या सेटवर ती आली होती. सोनाक्षी सिन्हा हिला ‘कौन  बनेगा करोडपती’  या सेटवर काही प्रश्न विचारण्यात आले.  काही प्रश्नाचे उत्तर तिने दिले. पंरतु एका साध्या सोप्या प्रश्नाचे उत्तर तिला देता आले नाही. यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

हा प्रश्न असा होता की, रामायणानुसार हनुमंताने कोणासाठी संजवणी औषधी आणली होती. या प्रश्नाचे उत्तर तिला देता आले नाही. त्यामुळे तिने एक्सपर्ट वाली लाइफलाईन वापरली. त्यानंतर तिला या प्रश्नाचे उत्तर लक्ष्मण आहे. असे समजले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *