‘अण्णांच्या जीवाशी खेळू नका’; शिवसेनेचा पाठिंबा

लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याची अमंलबजावणी व्हावी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा अशा काही मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत. मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून सुद्धा त्यांच्यावर राज्य सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहेत. राज्य सरकार अण्णांची दखल घेत नसल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: पत्र लिहून ‘त्यांच्या जीवाशी खेळू नका’ असे सरकारला आवाहन केले आहे.
नेमकं पत्रात काय म्हटलं ?
ज्येष्ठ समाजसेवक यांच्या उपषोणनाची सरकारने दखल घ्यावी.
अण्णांचे प्राण महत्वाचे असून ‘त्यांच्या जीवाशी खेळू नये’ असे आवाहन सरकारला दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अण्णांच्या आमरण उपोषणास पाठवलेले शुभेच्छा पत्रावर संताप व्यक्त केला आहे.
अण्णांचे उपोषण हे भ्रष्टाचार विरोधात असल्यामुळे त्यांनी प्राणत्याग करण्याऐवजी रस्त्यावर उतरून लढा द्यावा आणि देशाला जाग आणावी.
जनतेला गुंगीचे औषध देण्यात आले असून त्यांना बाहेर काढायला हवे. तसेच नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी.
गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी हरिद्वार येथे प्राध्यापक अग्रवाल उपोषणास बसले होते. मात्र सरकारने त्यांना मरू दिले. देशाची गंगा स्वच्छ करण्यासाठी उपोषण सोडून लढा द्यावा असेही त्यांनी म्हटलं आहे.
यासाठी शिवसेना नेहमी पाठिंबा देईल असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.