Wed. Aug 10th, 2022

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

Social ActivistVidya Bal at her home in Pune. Express Photo By Sandeep Daundkar, Pune,13.04.2016

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन झालं आहे. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज संध्याकाळी ५.३० वाजता पुण्यातील वैकुंठ स्माशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विद्या बाळ यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

विद्या बाळ यांनी महिला उन्नतीसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं होतं. त्यांच्या निधनामुळे अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

विद्या बाळ यांच्याबद्दल

विद्या बाळ यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ साली पुण्यात झाला. १९५८ साली फर्ग्युसन कॉलेजमधून बीए पर्यंतचं शिक्षण घेतलं.

पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली.

१९६४ ते १९८३ या काळात ‘स्त्री’ मासिकाचं सहाय्यक-संपादक पद भूषवलं. तर १९८३ ते १९८६ या काळात मुख्य संपादकपदाची धूरा सांभाळली.

ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरू केले.

मासिकात पहिल्या २० वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक ४५ लेखांच्या संग्रहाचे ’स्त्रीमिती’ नावाचे पुस्तक २०१२साली प्रसिद्ध

स्त्रियांच्या समस्यांबाबत विद्या बाळ यांना विशेष आस्था

१९८१ साली त्यांनी ’नारी समता मंच’ या संस्थेची स्थापना

ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ’ग्रोइंग टुगेदर’या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं.

विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रूपांतरित कादंबरी लिहिली आहे. त्यांच्या लेखणीतून अनेक स्फुट लेख उतरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.