सामाजिक सलोख्याचा करार

राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठणच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून राजकीय वादंग निर्माण होत आहेत. अशी परिस्थिती असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सोंडेघर गावाने एक पाऊल पुढे येत गावात सामाजिक सलोख्याचा १०० वर्षांचा करार केला आहे. राज्यामध्ये गेले काही दिवस सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र याचा आपल्या गावावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही असा दृढनिश्चय सोंडेघर गावाने केला आहे.
आपल्या गावामध्ये कोणताही वादविवाद होऊ द्यायचा नाही तसेच आपल्या गावात सुरू असलेली सामाजिक सलोख्याची भावना कायम टिकवून ठेवायची असा ठराव गावातील नागरिकांनी एकमताने केला आहे. या ठरावावर हिंदू, मुस्लिम, बौद्ध या तीनही धर्मातील लोकांनी सह्या केल्या असून यासाठी दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे आणि पालगड आणि ऐक्याचे प्रतीक सामाजिक सलोका दाखवून दिला आहे. काही मतभेद किंवा कौटुंबिक वाद धार्मिक वाद निर्माण झाल्यास या गावातील तीनही धर्मातील मोठी मंडळी एकत्र बसून सामोपचाराने गावातल्या गावात वाद मिटवला जातो त्यामुळे या गावातील वाद वेशीबाहेर जात नाही. गावात कोणत्याही प्रकारचे धार्मिक सामाजिक वाद होऊ नयेत यासाठी तंटामुक्तीच्या माध्यमातून गावामध्ये सर्वानुमते सामाजिक सलोख्याचा शंभर वर्षाचा लिखित करार केला आहे या लिखित कराराचे गावकऱ्यांनी स्वागत सुद्धा केले आहे
गावाने केलेल्या लिखित सामाजिक सलोख्याच्या करारामुळे कोणाच्याही अधिकारावर गदा येणार नाही याची काळजीसुद्धा गावकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे गावातील शांतता सुव्यवस्था कायदा अबाधित राखण्यासाठी निर्माण झालेल्या करातून लोकांचे अधिकार आणि कर्तव्य अबाधित ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न गावकऱ्यांकडून सुरू आहे. त्यामुळे या गावाने सार्वभौम पद्धतीने केलेल्या करारामुळे गावाच्या प्रगतीला हिताचे असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.