Jaimaharashtra news

देशावर संकट येताच रातोरात न्यूयॉर्कला पळून जाणारे शाहरुख खानचे कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल

देशावर संकट येताच रातोरात न्यूयॉर्कला पळून जाणारे शाहरुख खानचे कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल! कोरोना काळात अनेक सेलिब्रिटी ही भारताबाहेर जात असल्याचं दिसत आहे. नुकताचं एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh khan) याचा मुलगा आर्यन खान आणि पत्नी गौरी खान  हे बुधवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर स्पॉट केल्या गेले. हे दोघेही न्यूयॉर्कला रवाना होण्यासाठी विमानतळावर गेले होते. या दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर कठीण काळात देश सोडून चालल्याबद्दल त्यांच्यावर टीका करत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, ‘हे सेलिब्रेटी फक्त नावाचे भारतीय आहेत, जेव्हा जेव्हा देशावर एखादी समस्या येते तेव्हा ते देशापासून दूर पळून जातात.’ त्याच वेळी, दुसर्या वापरकर्त्याने लिहिले, ‘हो, जर भारताची परिस्थिती बिकट झाली, हे तर सर्व परदेशात पळून जातात, इथे पैसे मिळवा पण इथल्या लोकांना गरज पडल्यास बाहेर निघून जा. लॉकडाऊन फक्त सामान्य लोकांसाठी आहे का?, ही माणसे कशी जगभर फिरत आहेत’. त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले की, ‘कोणीतरी मालदीवला जात आहे, कोणी न्यूयॉर्कला जात आहे’. त्याचवेळी एकाने लिहिले, ‘त्यांना भारताबाहेरच काढा.’ अशा स्थितीत लोकांचा रोष या दोघांवर उमटला आहे.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हल्ली न्यूयॉर्कमध्ये एकटीच राहत आहे. कोरोना काळात, भाऊ आर्यन खान आणि आई गौरी खान हे तिला भेटण्यासाठी जात आहे. मात्र यातच त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे देशाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या शूटिंगला बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये चित्रपटांचे शूटींग होत नसल्यानं आणि लॉकडाऊनमुळे लोकांना घरातच राहावे लागत असलेल्यानं बॉलिवूड स्टार्स हे सुट्टीसाठी कुठेना कुठेतरी निघून गेला आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, सारा अली खान, जान्हवी कपूर, दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ सध्या मालदीवमध्ये आहेत. शिवाय काही दिवसांपूर्वी अनेक सेलिब्रिटी हे मालदीवच्या व्हेकेशन ट्रीपहून परत आले आहेत. यात श्रद्धा कपूर शेफाली जरीवाला आणि आरती सिंह यांचा समावेश आहे. तर बरेच टीव्ही सेलेब्सही मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. सुरभी ज्योती, टीना दत्ता आणि सृष्टी रोडे देखील सध्या मालदीवमध्ये आहेत.

Exit mobile version