Sat. Jul 31st, 2021

सोशल मीडिया वॉर रूम : पुण्यात काँग्रेस BJP च्या पुढे!

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया सर्वात महत्वाचा आहे. सोशल मीडियाच्या प्रचारात पुणे शहर काँग्रेसने आघाडी घेतलीय. काँग्रेसने पुण्यात उमेदवार घोषित केला नसला तरी काँग्रेसची सोशल वॉर रुम सज्ज झालीय.

काँग्रेसची सोशल मीडिया वॉर रुम

विरोधी पक्षाच्या प्रचाराला तोंड देणं,

पक्षाने शहरासाठी दिलेल्या योगदानाची लोकांना माहिती करून देणं,

पक्षाचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवणं

पक्षाचा जाहीरनामा प्रसारित करणं

विरोधीपक्षाच्या प्रचाराला प्रत्युत्तर देणं.

पक्षाच्या फेसबुक पेजवर ग्राफिक्स आणि डिझायरच्या माध्यमातून काँग्रेसची विचासरसरणी जनतेपर्यंत पोचवण्याचं काम करण्यात येत आहे.

पुण्याच्या काँग्रेस भवनात आठ जणांची टीम मिळून ही ‘वॉर रूम’ सांभाळत आहे.

BJP ची सोशल मीडिया वॉर रूम

BJP कडून गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

मात्र BJP ला अद्याप वॉर रुमसाठी जागाच मिळत नाहीये.

शहर भाजपच्या अधिकृत फेसबुकवरही निवडणुकीसंदर्भात अपडेट टाकले जात नाहीयेत.

शनिवारी BJPचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांचं जंगी स्वागत झालं.

मात्र त्यांचा एक साधा फोटो या पेजवर पोस्ट करण्यात आला नाहीये.

यंदाची लोकसभा निवडणूक सोशल मीडियात आहे, असं सांगत BJP नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

‘चौकीदार चोर है’ ला उत्तर म्हणून ‘मै भी चौकीदार’ ही मोहीम BJPने सुरू केली आहे.

त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असला, तरीही सोशल मीडियावरून त्यावर टीकाच होतेय.

अशावेळी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘वॉर रुम’ची गरज भासते.

मात्र BJPकडे अजूनही अशी वॉर रूम नाहीय. लोकसभा निवडणूक सोशल मीडियावर रंगायला लागली आहे. गेल्या निवडणुकीत BJP ने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत बाजी मारली होती. मात्र यावेळी पुण्यामध्ये तरी BJP अजून या ‘सोशल मीडिया वॉर’साठी तयार झालेली दिसत नाहीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *