Wed. Aug 4th, 2021

अण्णा हजारेंचं 20 डिसेंबरपासून मौनव्रत आंदोलन

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी परत एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अण्णा हजारे 20 डिसेंबरपासून मौनव्रत आंदोलन करणार आहेत.

काय म्हणाले अण्णा ?

देशात अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तरीही या घटनेविरुद्ध कुठेही कठोर कारवाई केली जात असल्याचा निदर्शनात येत नाही. एकीकडे नागरिक आता हैदराबाद येथील एन्काऊंटर बाजू घेऊन त्याचे स्वागत करताना दिसत आहेत. पण 2013 मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या बाबतीत अजूनही आरोपी जेलमध्येच आहेत.

त्यामुळे ज्या लोकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, त्याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा देशांमध्ये नागरिकांमध्ये असंतोष होईल. आणि अराजकता माजू शकते अशी भीती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलीये.

याबाबत आता सरकारने लवकरात लवकर पावले न उचलल्यास 20 डिसेंबरपासून मौनव्रत आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. तसेच सरकारने याबाबत कठोर पावले उचलली नाहीत तर हे आंदोलन पुढे अनिश्चित काळापर्यंत सुरु राहिल, असे देखील अण्णा हजारे यांनी सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *