Wed. Jun 26th, 2019

महाराष्ट्रासाठी घातक; ‘तुला पाहते रे’ मालिका बंद करा

0Shares

‘तुला पाहते रे’ या मराठी मालिकेची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेवरून सध्या प्रेक्षकांमध्येही मतभेद असल्याचे समोर येत आहे. कॉलेजमध्ये जाणारी 20 वर्षाची तरुणी आणि 40 वर्षाचा उद्योगपती यांच्यातली ही प्रेमकथा समाजातील नवीन पिढीसाठी घातक असून ही मालिका बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना या मालिकेचे प्रक्षेपण बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कोणताही संदेश दिला जात नाहीये, उलट महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा ध्यास आहे. 20 वर्षाची तरुणी 40 वर्षाच्या पुरुषाच्या प्रेमात पडते. हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. या मालिकेतून माता- भगिनींना एक वेगळाच संदेश देण्याचा घात निर्मात्यांनी घातला आहे, असे नाईक यांनी निवेदनात लिहीले आहे.

या मालिकेत बदल करावा किंवा मालिकेचे प्रक्षेपण बंद करण्यात यावे अशी मागणी देखील नाईक यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर देखील या मालिकेच्या विरोधात चर्चा सुरू होत्या. असे असले तरी टीआरपीच्या स्पर्धेत मात्र या मालिकेने आपले स्थान टिकवून ठेवले आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: