Fri. May 20th, 2022

सोलापूरात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या इमारतीचा स्लॅब कोसळला

सोलापूरच्या करमाळा येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या इमारतीचा स्लॅब कोसळला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 25 ते 30 कर्माचाऱ्यांसह 10 ग्राहक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापैकी 16 जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी करमाळाच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. बॅंकेतून सहा जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले असून अजून अधिक लोकं अडकल्याची भीती आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात …

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.