Jaimaharashtra news

साखर कारखान्याच्या संचालकांना लाखोंचा गंडा

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

सोलापूर जिल्ह्यातील खुडूसमधील रहिवासी आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक नामदेव ठवरे आणि  त्यांची पत्नी शांताबाई

ठवरे यांना 32 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.

 

या प्रकरणी इंडिया फास्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीचे एंजन्ट अब्बास बोहरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

विठोबा ठवरे आणि त्यांच्या पत्नीचं बॅंक ऑफ बडोदाच्या अकलूज शाखेत बचत खात आहे. त्यांची अब्बास बोहरी यांच्याबरोबर ओळख झाली, त्याने बॅंकेची काम करुन

देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ठवरे दाम्पत्याचा विश्वास संपादन करून त्यांच्या खोट्या सह्या आणि मोबाईल बॅंकींगच्या माध्यमातून लाखोंचा गंडा घातला.

Exit mobile version