Thu. Sep 29th, 2022

विखे पाटलांनंतर रणजितसिंह मोहिते पाटील भाजपाच्या वाटेवर

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्ष या दृष्टीने हालचाल करताना दिसत आहेत. भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असून  विखे-पाटलांनंतर आता मोहिते-पाटील सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल उशिरा रात्री मुंबईत रणजित सिंह मोहिते पाटील यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आज दुपारी अकलूजमध्ये मोहिते-पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये बैठक होणार असून  यामध्ये त्यांच्या उमेदवारीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

 मोहिते- पाटील समर्थकांमध्ये बैठक

राष्ट्रवादीने लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करुनही  माढा मतदारसंघाचा पेच कायम आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार कोण? याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचंही म्हटलं जातयं.

अकलूजमध्ये मोहिते-पाटील समर्थकांची बैठकीनंतर रणजितसिंह मोहिते-पाटील  पुढची दिशा ठरवतील.

रणजितसिंह मोहिते-पाटलांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतल्याने या चर्चा होत आहेत.

त्यावेळीही ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली होती. आज त्यावर निर्णय होईल.

भाजपाकडून मोहीते पाटलांच्या उमेदवाराला  हिरवा कंदील

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटीलांना  हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.