Thu. Jan 28th, 2021

आदिवासी विद्यार्थ्यानी बनवली सौर उर्जेवर चालणारी कार

पालघर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आदिवासी विद्यार्थ्यानी सौर उर्जेवर चालणारी सोलर कार संशोधनातून बनविली आहे.

शैक्षणिक उपक्रमाबाहेर जाऊन इंधन बचत आणि प्रदुषण टाळण्यासाठीच्या या संकल्पना आकर्षणाचा विषय ठरत असून सध्या ही सोलर कार चर्चेचा विषय बनली आहे.

इंधनापासून होणारे प्रदूषण त्यातच दिवसेंदिवस वाढत चालले आहे. इंधनाचे दर आणि त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हा लक्षात घेऊन पालघरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी सौर उर्जेवर चालणारी हे नवीन कार तयार केली आहे.

टाकाऊपासून टिकाऊ आणि सौर ऊर्जा वापरून कमी खर्चात ही कार विविध शाखांच्या विद्यार्थ्यांच्या हातानी तंत्र शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली आहे. भंगारातून विकत घेतलेल्या एका वाहनाला सोलर ऊर्जेचा वापर करून या गिअर सोलर व्हॅनची निर्मिती करण्यात आली.

या सोलर व्हॅनमूळे, सोलर एनर्जीचा वापर करून व इंजिनमुळे निकामी झालेल्या वाहनांचा व्यवहारात पुन्हा वापर करता येऊ शकतो. तसेच इंधन विरहित कार असल्याने ध्वनिप्रदूषण , वायुप्रदूषणही टाळता येणार आहे.

ही सोलर व्हॅन दिवसा सौर ऊर्जेवर व रात्रीच्या वेळेसाठी बैटरी बैकअप देण्यात आल्याने रात्री सुमारे 55 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

या प्रशिक्षण संस्थेत बहुतांश ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या व्यवसायात प्रशिक्षण घेतात. सुमारे एक महिना सतत काम व कौशल्य वापरून विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या या गाडीसाठी साधारपणे 1लाख रुपये खर्च आला आहे.

या सोलार कारची प्राथमिक चाचणी यशस्वीरित्या पार पडली असून कोणत्याही रस्त्यावर इंजिना शिवाय त्याच वेगात ती धावू शकते. या कारमध्ये आणखीन अद्यावतीकरण करण्यात येणार असून येत्या दोन महिन्यात पूर्णपणे सक्षमरित्या धावण्यासाठी तयार असेल.

तसेच या कारचे पेटंट बनवणार असल्याचेही तंत्र शिक्षक जीवन पाटील म्हणतात. येत्या काळात ही कार विविध ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून भविष्यात इंधनविना चालणारी ही कार वाहतुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सोलर कारची शासनाने योग्य दखल घ्यावी हीच अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *