Sun. May 16th, 2021

जवानाचे कोसळलं पॅराशूट आणि अडकून राहीला झाडावर

नाशिकमध्ये आज सकाळी नऊच्या सुमारास आर्मीच्या जवानाचं पॅराशूट कोसळलं होतं. बाभळीच्या झाडावर हे पॅराशूट कोसळल्याने जवान काही काळ अडकून पडला होता.

मात्र, त्याला एका शेतकऱ्यानं सुखरूप बाहेर काढले. यामध्ये बाभळीचे काटे अंगाला टोचल्यानं जवान किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही.

हनिप नापा असे या जवानांचे नाव असून तो अमित कोठे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडावर अडकला. याची माहिती अमित कोठे यांना कळताच ते त्वरीत जवानाला वाचवण्यासाठी गेले. मात्र झाड मोठे असल्याने त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले होते. बाभळीचं झाड पाडून जवानाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी आर्मीचे अधिकारी मदतीसाठी तात्काळ दाखल झाले होते.

दैनंदिन सराव करत असतांना तीन पॅराशूट फेल झाले. मात्र, त्यातील दोन सुखरूप खाली उतरले आणि एक बाभळीच्या झाडावर कोसळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *