Tue. Aug 9th, 2022

दहशतवाद्यांसोबत लढताना जोतिबा चौगुले यांना वीरमरण

कोल्हापूर : जम्मूतील राजुरीतल्या केरी सेक्टर मध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत जखमी झालेल्या कोल्हापुरच्या जवानाला वीरमरण आले आहे. कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील तासगाव तालुक्यातील महागावचे जवान जोतिबा गणपती चौगुले शहीद झाले आहेत. आपल्या गावातील जवान शहीद झाल्याने महागाववासीयांवर शोककळा पसरली आहे.

वीर जवान जोतिबा चौगले हे 2009 साली सैन्यदलात भरती झाले होते. जम्मूमध्ये राजुरी इथं ते कार्यरत होते. त्यांच्यावर उद्या मंगळवारी 17 डिसेंबरला लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.