Mon. May 10th, 2021

धक्कादायक! पोटच्या मुलानेच केला आईचा खून

पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये एका मनोरुग्ण मुलाने आपल्याच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोरुग्ण मुलाने आईच्या गळ्यावर कात्रीने वार करत खून केल्याचे समजते आहे. मनोरुग्ण मुलाचे नाव भुपेंद्र सावंत असून सुमन सावंत असे त्याच्या आईचे नाव आहे. भुपेंद्र सावंत यांनी यापूर्वी सुद्धा आपल्या आईवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

पिंपरी- चिंचवडमध्ये एका मनोरुग्ण मुलाने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आपल्याच आईच्या गळ्यावर कात्रीने वार करत त्यांचा खून केला.

भुपेंद्र सावंत (४०) असे मनोरुग्ण आरोपीचे नाव असून सुमन सावंत (६०)असे खून झालेल्या आईचे नाव आहे.

धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी सुद्धा भुपेंद्रने आपल्या आईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र सुमन सावंत थोडक्यात बचावल्या. तसेच त्यावेळी त्यांनी पोलिसातही तक्राक दाखल केली नाही.

काही काळाने भुपेंद्रने रविवारी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास कात्रीने वार करून खून केल्याचे समोर आले.

सकाळपासून सुमन यांनी दरवाजा का उघडला नाही याचा तपास घेताना शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिल्यानंतर खून झाल्याचे समजले.

भुपेंद्र हा सुमन यांचा एकलुता एक मुलगा होता.

काही वर्षांपूर्वी सुमन यांच्या पतीचे निधन झाले होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *