Tue. Sep 28th, 2021

कर्जबाजारी मुलाने जन्मदात्या आईचीच केली हत्या

रत्नागिरीच्या लांज्यामध्ये साटवली गावात मुलानेच जन्मदात्या आईची दगडाने डोकं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोक्यावर कर्जाचे डोंगर असताना आई सोन्याचे दागिने देत नसल्यामुळे मुलाने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं ?

रत्नागिरी येथील साटवली गावात मुलाने आपल्याच आईची हत्या केल्याची समजते आहे.

कर्जबाजारी झालेल्या मुलाने आई सोन्याचे दागिने देत नाही म्हणून तिची दगडाने ठेचून हत्या केली.

धक्कादायक बाब म्हणजे आईचा मृतदेह जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

साटवलीतील गोळवशी गावातील फातीमा काळसेकर (वय 61) असे बळी पडलेल्या मातेचे नाव आहे.

फातीमा ह्या त्यांच्या नवरा आणि मुलांसोबत राहत होत्या.

मजहर असे फातीमा यांच्या मुलाचे नाव आहे.

मजहर हा कर्जबाजारी होता आणि हे कर्ज फेजण्यासाठी त्याला पैशांची गरज होती.

बॅंकेचे हप्ते थकले होते, त्याच वेळी हे हप्ते फेडण्यासाठी मजहरने त्याच्या आईकडे सोन्याच्या दागिन्यांसाठी तगादा लावला होता.

दागिने देण्यासाठी फातीमांचा स्पष्ट नकार होता.

या कारणामुळे फातीमा आणि मजहरची पत्नी यांच्यात खटके उडत होते.

अखेर या साऱ्या प्रकाराला कंटाळून मजहरने अगदी टोकाचे पाऊल उचलत आईला संपवण्याचे ठरवले.

फातीमा लांज्याच्या आठवडाबाजाराला जात असताना मजहरने मोटारसायकलने जात रस्त्यात गाठले.

फातीमांना मोटारसायकलवर घेत त्यांना साटवलीच्या निर्जन रस्त्यानजीक नेले.

मोटारसायकल थांबवत कुणी नसल्याचे पाहत मजहरने शेजारी उभ्या असणाऱ्या आईच्या डोक्यात दगड घातला.

शिवाय चेहरा आणि डोळे दगडाने विदृप केले.

इतकेच नव्हे तर मजहरने त्याच्या आईच्या अंगावर गवताचा पेंढा आणि पेट्रोल टाकून तिला जाळून टाकले आणि काहीच न घडल्याप्रमाणे मजहर घरी आला.

फातीमा घरी न परतल्याने घरच्या लोकांनी फातीमा बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांना तीन दिवसांनी फातीमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली.

अखेर, चौकशीनंतर मजहरच्या मुसक्या आवळ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *