Fri. Nov 15th, 2019

बीएसएफमधील जेवणाची तक्रार करणाऱ्या ‘त्या’ जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

लष्करातील जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून, त्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिणारे जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. 22 वर्षाच्या रोहित यादवचा मृतदेह रेवाडीच्या शांती विहार परिसरातील घरात आढळला. याप्रकरणी पोलीस तपास करत असून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

काही दिवसांपू्र्वी जम्मू-काश्मीरमध्ये देशाचं रक्षण करणाऱ्या बीएसएफच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाबद्दल यादव यांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केले होते. तसेच याबाबतचे पत्रही त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिले होते. या गोष्टीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या व्हिडिओची आणि यादव यांच्या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने संबंधित तुकडीच्या वरिष्ठांना जाब विचारणारे पत्र लिहिले होते. यामुळे तेज यादवचा नंतर छळ करून त्यांना बीएसएफमधून सस्पेंड करण्यात आले होते.

यादव यांचा मुलगा दिल्लीत शिक्षण घेत असून तो काही दिवसांसाठी घरी आला होता. यादव सध्या प्रयागराजच्या कुंभमेळ्याला गेले आहेत. त्यांची पत्नी संध्याकाळी कार्यालयातून घरी आली असता तिने रोहितच्या खोलीचे दार वाजवले. पण तो दरवाजा उघडत नव्हता. तेव्हा दार जोरात ढकलल्यावर पलंगावर रोहितचा मृतदेह तिला आढळला. रोहितच्या हातात पिस्तूल होते. या पिस्तूलानेच स्वत:ला गोळी मारून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिल लक्षणे दिसत आहेत. पण ही पिस्तूल नक्की कोणाची आहे ? याबद्दल मात्र शंका व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *