Sun. Sep 19th, 2021

दीपिका- रणवीर झाले आई-बाबा, ‘हा’ त्यांचा मुलगा!

काही महिन्यांपूर्वीच इटलीमध्ये विवाहबद्ध झालेलं बॉलिवूडचं स्टार कपल म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. ही जोडी विवाहाला इतके दिवस लोटल्यावरही कायमच चर्चेत असते. आताही या जोडीसंदर्भात मिळालेल्या बातमीने चाहत्यांना जोरदार धक्का बसलाय. कारण रणवीर दीपिका यांच्या मुलाबद्दल बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू झालीय. पण रणवीर दीपिकाला मुलगा झाला कधी आणि याबद्दल कुणालाच कसं कळलं नाही, याची चर्चा सुरू झालीय.

सध्या लंडनच्या दौऱ्यावर असणाऱ्या रणवीर दीपिकाचा मुलगा हा त्यांचा दत्तक मुलगा आहे आणि गंमत म्हणजे हा त्यांचा मुलगा लहानगा नसून मोठा सेलिब्रिटी आहे.

कोण आहे रणवीर दीपिकाचा मुलगा?

रणवीर दीपिकाने ज्या सेलिब्रिटी मुलाला दत्तक घेतलंय, तो सेलिब्रिटीही सध्याचा सुपरस्टार आहे.

रणवीर- दीपिकानं दत्तक घेतलेला हा स्टार आहे वरूण धवन!

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये यासंदर्भात खुलासा झलाय.

या व्हिडिओमध्ये वरुण धवन याने गमतीदार पद्धतीने रणवीर- दीपिकाला आपले ‘पालक’ म्हणून संबोधलं आहे.

तसंच दीपिका आपली आईसारखी किती काळजी घेते, हे देखील त्याने सांगितलं आहे.

त्यामुळे दीपिका आणि रणवीरने त्याला दत्तकच घेतल्याची चर्चा रंगलीय.

रणवीर- दीपिका सध्या लंडनला फिरायला गेले आहेत.

लंडनमध्येच वरूण धवन देखील आपल्या आगामी सिनेमाचं शूटिंग करतोय.

जेव्हा हे तिघे लंडनमध्ये एकमेकांना भेटले, तेव्हा त्यांनी मजा म्हणून एक व्हिडिओ तयार केला.

याच व्हिडिओमध्ये वरूण धवनने रणवीर दीपिकाने आपल्याला दत्तक घेतलं असल्याचं म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *