Mon. May 17th, 2021

सोनाक्षी सिन्हाची ‘ऑनलाईन’ फसवणूक!

मोठमोठे स्टार्स कुठे खरेदी करतात, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेला असतो. ते बहुतेकदा परदेशात जाऊनच खरेदी करत असतील असा आपला समज असतो. मात्र स्टार्सही आपल्याप्रमाणे ऑनलाईन खरेदी करतात आणि त्यांचीसुद्धा इतरांप्रमाणे फसवणूक होऊ शकते, हे नुकत्या सोनाक्षी सिन्हासोबत घडलेल्या घटनेवरून दिसून आलंय.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अमेझॉन या प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून 18 हजार किंमतीचे हेडफोन्स ऑर्डर केले. मात्र जेव्हा तिच्या घरी ऑनलाईन ऑर्डरचा बॉक्स आणि आणि तिने तो उघडला, तेव्हा तिला चांगलाच धक्का बसला. कारण बॉक्समध्ये तिने ऑर्डर केलेले हेडफोन्स नव्हते, तर चक्क नटबोल्ट्स होते.

आपली फसवणूक झाल्याचं कळताच चिडलेल्या सोनाक्षीने ट्विट करत घडलेल्या प्रकाराबद्दल अमेझॉन कंपनीला धारेवर धरलं. 18 हजार किंमतीचे बोस कंपनीचे ब्रॅण्ड न्यू हेडफोन्स मागवल्यावर हातात चक्क गंजलेले नटबोल्ट्स मिळाल्यामुळे सोनाक्षीने अमेझॉनला टॅग करत दोन ट्विट्स केली.

 

Hey @amazonIN! Look what i got instead of the @bose headphones i ordered! Properly packed and unopened box, looked legit… but only on the outside. Oh and your customer service doesnt even want to help, thats what makes it even worse. pic.twitter.com/sA1TwRNwGl

— Sonakshi Sinha (@sonakshisinha) December 11, 2018

 

‘बोस कंपनीचा पूर्ण सील केलेला बॉक्स आपल्याकडे आला होता. पण त्यात हेडफोन्स नव्हते. याबाबत कस्टमर केअरला फोन केल्यावर त्यांनीही मदत केली नाही. असं तिने ट्विट्समध्ये म्हटलंय.

 

Anybody want to buy a brand new shiny piece of junk for 18,000 bucks? (Yup, its a steal) Dont worry, im selling, not @amazonIN, so ull get exactly what you’re ordering. pic.twitter.com/3W891TA7yd

— Sonakshi Sinha (@sonakshisinha) December 11, 2018

सोनाक्षीच्या ट्विटनंतर अमेझॉनने तिची माफी मागितली. तर अनेक ट्विटरतींनी त्यातही थट्टा मस्करी सुरू केली.

Uh-oh! This is unacceptable! Apologies for the recent ordering experience and the subsequent correspondence with our support team. Please share your details here: https://t.co/vIE01Lj9nJ, we’ll get in touch with you directly. ^JC

— Amazon Help (@AmazonHelp) December 11, 2018

I think BJP has planned this as a gift for your father’s contribution towards BJP victory in MP, Rajasthan and Chattisgarh

— Thakur Pankaj Sengar ⏺️ (@ThakurKiThokar) December 12, 2018

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *