Wed. May 12th, 2021

अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच मायदेशी परतणार

अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅन्सरशी झुंज देत असलेली सोनाली लवकरच मायदेशी परतणार आहे. खुद्द सोनालीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. न्यूयॉर्कमध्ये अनेक महिने कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर आता सोनाली घरी परतणार आहे. घरापासून अंतर वाढते तसतसे आपले आपल्या घराशी असलेले नाते घट्ट होत जाते. न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरशी लढताना मी हेच शिकले. आता मी माझे हृदय जिथे वसते, त्या माझ्या घरी परतते आहे. घरी परतण्याचा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्या कुटुंबाला, मित्रांना भेटणार, याचा खूप आनंद आहे, असे सोनालीने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे. कॅन्सरशी सुरू असलेली झुंज अद्याप संपलेली नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे. ‘कॅन्सरशी झुंज संपलेली नाही. पण यादरम्यान मिळालेल्या मध्यांतराचा आनंद आहे. आपल्या माणसांना भेटून मी अधिक ताकदीने कॅन्सरशी लढू शकेल, असे तिने म्हटले आहे.

सोनाली आपल्या मायदेशी परतणार आहे पण काही दिवस घरी विश्रांती करून ती पुन्हा उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *