सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग पी. चिदंबरम यांच्या भेटीला

माजी गृहमंत्री आणि केंद्रीय कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांना INX मीडिया घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरूंगात ठेवण्यात आले आहे. पी. चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तिहार तुरूंगात पोहोचले होते. पी. चिदंबरम यांची महिनाभरापासून 14 दिवसांची कोठडी संपल्यानंतर वाढवण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं ?

INX मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांना दिल्लीतील घरातून अटक करण्यात आली होती.

दिल्लीतील कॉंग्रेसच्या कार्यलयात पत्रकार परिषद घेतल्यानंतर दिल्लीतील घरातून चिदंबरम यांना सीबीआय आणि ईडीने अटक केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.

अटक झाल्यानंतरही कॉंग्रेससोबत असल्याचे दाखवण्यासाठी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहार तुरूंगात दाखल झाले होते.

सकाळी 9 वाजताच्या सुमारास सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहार तुरूंगात दाखल झाल्याचे समजते आहे.

 

 

Exit mobile version