Fri. Feb 21st, 2020

सोनिया गांधींची 17 विरोधी पक्षांना एकत्र आणून महाआघाडीच्या दिशेने पावलं

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी आपापली मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी शुक्रवारी 17 विरोधी पक्षांना एकत्र आणून महाआघाडीच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरूवात केली.

 

या बैठकीस काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, शरद पवार, ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव, मायावती, सीताराम येच्युरी, उमर अब्दुल्ला, कनिमोळी यांच्यासह सतरा पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

मात्र, त्याच वेळी बिजू जनता दल, अण्णाद्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस आदी विरोधी पक्षांनी बैठकीकडे पाठ फिरविली. तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादवसुद्धा बैठकीकडे फिरकले नाहीत.

 

त्यांच्या अनुपस्थित रामगोपाल यादव यांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय आम आदमी पक्षाला निमंत्रणच देण्यात आले नव्हते. सर्व विरोधी पक्षांच्या या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी मारलेल्या दांडीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *