सोनू गाण्याच्या ‘चाली’वर सोलापूर महापालिकेची पोलखोल
जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
सोलापूर महापालिकेत आज सोनु गाण्याचा जलवा पहायाला मिळाला. ‘सोनु’ गाण्याचं विडंबन करत विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांनी विविध समस्या मांडत ठिय्या आंदोलन केलं. यामध्ये बसपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयआम, माकप पक्षातले नगरसेवक सहभागी झाली होते.
सोनु गाण्याच्या चालीवर बेताल महापालिकेची विरोधी पक्षातील नगरसेवकांनी पोलखोल केली. शहरात साचलेला कचरा, 5 दिवसांआड येणारं पाणी, डेंग्युसारख्या रोगाचा वाढणारा प्रभाव या समस्या गाण्यातून मांडल्या होत्या. नागरी प्रश्नाकडे पालिकेचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. शिवसेना मात्र या आंदोलनापासून दूरच होती.