व्हॅक्सिनच्या किंमती जाहीर झाल्यानंतर बॉलिवूड कलाकारांनी केली नाराजी व्यक्त

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्यानं दिवसेंदिवस कोरोना पेशंटची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारनेही अनेक प्रयत्न केले. काही उपाय योजना आखल्या आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली मात्र तरीही कोरोना आटोक्यात येत नाही आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी देशात कोरोनाचे वॅक्सिन दिले जात आहे. परंतु अनेक ठिकाणी या वॅक्सिनचा काळाबाजार होत आहे. तर काही खासगी हॉस्पिटलमध्ये हे वॅक्सिनसाठी दुप्पट किंमत आकारली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने तयार केलेल्या कोविडशिल्ड वॅक्सिनच्या किंमती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता हे वॅक्सिन घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत.

या निर्णयाबद्दल अभिनेता सोनू सुद आणि फरहान अख्तर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय कोविडशिल्ड वॅक्सिन राज्याला ४०० रुपयांमध्ये, खासगी रुग्णालयांना ६०० रुपये आणि केंद्र सरकारला १५० रुपयांमध्ये दिले जाणार असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. यावर कंपनीच्या या भूमिकेवर अभिनेता सोनू सुद आणि फरहान अख्तर यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. असून अनेक यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय या दोघांनी केलेल्या नाराजीवर सर्वसामान्य लोकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया द्यायाला सुरुवात केली आहे. सोनू सुदने एक स्क्रिनशॉट ट्वीट करत म्हटलं की, ‘सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांना वॅक्सिन मोफत देणे आवश्यक आहे. याच्या किंमतीवरती नियंत्रण ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. मोठे उद्योजक आणि ज्या लोकांना हे वॅक्सिन घेणे परवडते त्यांनी पुढाकार घेऊन ज्यांना या किंमती घेणे परवडत नाही त्यांना ते घेऊन देण्यासाठी मदत करावी. व्यवसाय करून नफा कधीही कमवता येऊ शकतो.’ यावर अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरने देखील स्क्रिनशॉट ट्वीट करत लिहिले, ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रवक्ते आम्हाला सांगतील का केंद्राला ज्या किंमतीमध्ये हे वॅक्सिन दिले जाते त्याच किंमतीमध्ये राज्याला का दिले जात नाही? जर तुम्हाला असे करणे योग्य वाटत नसेल तर त्याचे स्पष्टीकरणही तुम्ही द्यायला हवे.’ असा पध्दतीने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version