सुरेश रैनाने मानले सोनू सूदचे आभार

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयात आरोग्य संस्थेवर ताण आला आहे. तसेच आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
अशा परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूद हा सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाचा आधार बनला आहे. आपल्या परिने शक्य तेवढी सगळी मदत सोनू सूद करत आहे. टीम इंडियातील माजी खेळाडू आणि चेन्नई संघातील स्टार खेळाडू सुरेश रैनाला देखील सोनू सूदने मदत केली आहे.

रैनाची काकू कोरोनाच्या विळख्यात सापडली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजनची आवश्यकता असल्यानं रैनाने सोशल मीडियावर मदत मागितली. सोनू सूदला हा संदेश मिळताच त्याने रैनाला पुढच्या १० मिनिटांत ऑक्सिजन मिळेल असेल आश्वासन दिलं. सोनूने त्याला मदतीचा हात दिला आणि त्यामुळे रैनाच्या कुटुंबातील व्यक्तीला ऑक्सिजन मिळाला आहे.

सुरेश रैनाने ट्वीटरवर सोनू सूदचे आभार मानले आहेत. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यानं त्याने ट्वीटरवर मदत मागितली आणि सोनूने तातडीने तो मिळवून दिला. त्यामुळे ‘रैनाने सोनी पाजी मी तुमचा खूप आभारी आहे’ असं म्हणत काळजी घ्या असं ट्वीट रैनानं केलं आहे.

Exit mobile version