Sat. Nov 27th, 2021

मुंबईत बसून अभिनेता सोनू सूदला जे जमते, ते स्थानिक नेत्यांना का नाही?

नागपूरात दररोज कोरोनामुळे अनेक जीव जात आहे. दिवसेंदिवस परिस्थिती ही फार गंभीर होत आहे. यातचं एक समोर आली आहे भंडारा जिल्ह्यातील एका मजुराला कोविड पॉझिटिव्ह असताना दवाखान्याची भटकंती करूनही बेड मिळत नव्हता. तर दुसरीकडे रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती. यात ट्विटरवर अभिनेता सोनू सूदला मदत मागितली. त्याने 15 मिनिटात बेड मिळेल असं सांगितलं आणि अवघ्या काही वेळातच बेड उपलब्ध झाला. या सर्वात मुंबईत बसून, एका गरीब मजुरांसाठी सोनू सूदने जे केले, ते इतर राजकीय नेत्यांना जमणार का? हा प्रश्न निर्माण होत आहे. नागपूर आणि भंडारात कोनाचा हाहाकार सुरू आहे. यामुळेच शहरात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील मजुराच्या मुलाने ट्विट करून मदतीचे आव्हान केले होते . त्यानंतर काही वेळातच मेयो हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाला बेड उपलब्ध झाला. नागपूरात आजच्या घडीला 7244 बेडवर रुग्ण उपचार घेत आहे. पण दररोज इतकेच किंवा यापेक्षा जास्त रुग्ण दररोज नव्याने बाधित होत आहे. यात 71 हजारच्या वर रुग्ण सक्रिय असून त्यांना उपचार मिळणे कठीण झालं आहे. ही परिस्थिती फारच गंभीर झाल्याचं नागपूर आणि भंडारात दिसत आहे.

यापूर्वी देखील पहिल्या लाटेत अभिनेता सोनू सूदने मजुरांची मदत केली होती. दुसऱ्या लाटेतील परिस्थिती अधिक कठीण होत चालली असतांना, सोनू सूद अनेकांना मदत करत आहे. नागपूरात उपचार घेणाऱ्या रुग्णाला बेड मिळताच उपचार सुरू झाला असल्याने त्या रुग्णाच्या मुलाने आभार मानले. सोनू सूदला मदत मागण्यापूर्वी काही राजकीय मंडळींना सुद्धा मदत मागितली, परंतु मदतीसाठी कोणीच धावले नाही. मात्र सोनू सूद मदत मागताच मदत लगेच मिळाली. त्यामुळे जे काम नेत्यांनी करायला पाहिजे ते काम सोनू सूद करत आहे असं जनता सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट् द्वारे आपली प्रतिक्रिया देत आहे. नागरपूरच्या रुग्णाच्या आभार ट्विटवर उत्तर देताना सोनू सूद म्हणतात की, “बात तो तब है जब देश मे हर जरूरतमंद को बेड मिल जाए। कोशीष जारी है । सोनू सूदच्या ट्विटर हँडलवर मदत मागण्यांसाठी अनेक ट्विट पडतांना दिसून येत आहे. शिवाय काम होताच लोक आभार सुद्धा मानत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *