Fri. Sep 17th, 2021

BCCI च्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली जवळपास निश्चीत

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आनंद व्यक्त केला आहे

बीसीसीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचं नाव पुढं आल्याने त्याने ही यावर आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. 10 महिन्यांच्या कार्यकाळासाठी ही निवड केली आहे. काहीतरी चांगलं करून दाखवण्याची ही मोठी संधी आहे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत रविवारी बैठक झाली यामध्ये गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ते आज दुपारी अर्ज दाखल करणार असून कुणाचाही अर्ज न आल्याने त्यांची निवड निश्चीत मानली आहे.

सौरव गांगुलीची प्रतिक्रीया

भारतीय संघाचं नेतृत्व मी याआधी फक्त देशासाठी केलं परंतु ही संधीमुळे मला चांगलं काम करता येईल. त्यामुळे या संधीबाबत मला आनंद होत आहे.

बीसीसीआयवरती झालेल्या अनेक आरोपांमुळे तीन वर्षांत मंडळाबद्दल अनेक वाईट चर्चा होत आहेत. यामुळे तिची प्रतिमा सुधारण्याची संधी मला मिळाली आहे.

भारत हे आर्थिकदृष्ट्या क्रिकेटचं क्रिकेटसाठी महत्वाचे असल्याने बिनविरोध निवड होणं ही माझ्यावरती येणारी एक मोठी जबाबदारी आहे.

माझ्यावर येणारी ही जबाबादारी म्हणजे एक आव्हान आहे. असं मत ही त्याने व्यक्त केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंसाठी काम करेन असं ही ते म्हणाले आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *