Tue. Oct 19th, 2021

SAvsAUS,2nd odi : साऊथ आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने विजय

साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या वनडेमध्ये ६ विकेटने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला विजयासाठी २७२ धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान साऊथ आफ्रिकेने ९ बॉलआधी ६ विकेट राखून पार केले.

या विजयासह साऊथ आफ्रिकेने मालिका जिंकली आहे. आफ्रिकेने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या आफ्रिकेची निराशाजनक सुरुवात झाली. आफ्रिकेने पहिली विकेट १ धावांवरच गमावली.

आफ्रिकेचा कॅप्टन क्विंटन डी कॉक याला भोपळा देखील फोडता आला नाही. डी कॉक याला मिचेल स्टार्क याने बोल्ड केलं.

यानंतर आफ्रिकेच्या बॅट्समननी योग्य खेळी करत विजयी आव्हानाच्या जवळ पोहचवण्याचे काम केले.

आफ्रिकेकडून सर्वाधिक जानेमन मालन याने शतकी कामगिरी केली. जानेमन याने १२९ धावा केल्या.

यात त्याने ४ सिक्स आणि ७ फोर लगावले.

याव्यतिरिक्त हेनरिक क्लॅसेनने ५१ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पाने २ तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या दोघांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन एरॉन फिंच आणि डी आर्सी शॉर्ट या दोघांनी प्रत्येकी ६९ धावांची खेळी केली. डेव्हिड वॉर्नरने ३५ तर मिशेल मार्शने ३६ धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० ओव्हरमध्ये १० विकेट गमावून २७१ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिेकेकडून लुंगी एन्गिडी याने ६ विकेट घेण्याची कामगिरी केली. तर इतर बॉलर्सने चांगली साथ दिली.

दरम्यान वनडे मालिकेतील तिसरी आणि शेवटची मॅच ७ मार्चला खेळण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *