एका महिलेने तब्बल 10 मुलांना दिला जन्म, गिनीज बुकात रचला रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेत एका महिलेने १० मुलांना जन्म दिला आहे. आफ्रिकेतील महिला गोसिअमे थमारा सितोले (वय ३७) या महिलेने १० मुलांना जन्म दिला आहे. यामध्ये सात मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. तसेच एक महिन्यापूर्वीच माली देशातील महिलेने मोरक्कोमध्ये ९ मुलांना जन्म दिला होता. आफ्रिकी मीडियाच्या माहितीनुसार, सिटहोलचे पतीने आठ मुलांची शक्यता वर्तवली होती. गरोदरपणात दोन मुलांबाबत काहीच माहिती मिळाली नाही. बहुतेक इतर दोन मुलं दुसऱ्या ट्यूबमध्ये असल्याची शक्यता वर्तवली होती. दाम्पत्य 10 मुलांच्या जन्माने अतिशय आनंदी आहे. तसेच कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे. एकाचवेळी 10 मुलांना जन्म देणं गोसियामी धमाराकरता सोपी गोष्ट नव्हती. ऑपरेशन यादरम्यान डॉक्टरांनी अतिशय काळजी घेतली होती. सगळ्या मुलांना वाचवण्यात डॉक्टर यश आलं आहे . सिटहोलने मीडियाला सांगितलं की, महिला आपल्या या प्रेग्नेंसीमुळे खूप हैराण होती.’ सिटहोलने दिलेल्या माहितीनुसार, महिला ही अतिशय आजारी होती. तिच्यासाठी हे खूप कठीण होतं. आताही हा सगळा प्रकार कठीण आहे. मात्र आता तिला याची सवय झाली आहे. सिटहोलने सांगितलं पुढे सांगितलं, तिला त्रास होत नव्हता पण हे खूप कठीण होतं. मी फक्त देवाला प्रार्थना करू शकते. काही महिने मुलं इन्क्यूबेटरमध्ये राहणार आहे. मुलांना इन्क्यूबेटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. सितोलेचे पती टेबोगो त्सोत्सीने सांगितले की, ७ जून रोजी प्रिटोरियन रुग्णालयात सिजेरियन शस्त्रक्रियेने प्रसुती झाली. डॉक्टरांनी गरोदरपणाच्यावेळी केलेल्या तपासणीत सहा मुले असल्याचे टेबोगो यांना सांगितले होते. त्यानंतर आठ मुले असल्याचे सांगितले. मात्र, प्रसुतीवेळी १० मुलांचा जन्म झाला. या आफ्रिकन जोडप्याला याआधीच जुळे मुले आहेत. टेबोगो त्सोतेत्सी यांनी सांगितलं की, सध्या ते बेरोजगार आहेत. मात्र मुलांच्या जन्मानंतर मी भावूक झालो असून आनंदी आहे. डॉक्टरांनी अधिकृतपणे याला दुजोरा दिल्यास हा एक विक्रम असणार आहे.

Exit mobile version