Sat. Jun 6th, 2020

एका दिवसासाठी भारतात येणार ‘या’ साऊथ सुपरस्टारचा मादाम तुसादमधील मेणाचा पुतळा!  

साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात साऊथ महेश बाबू याचा मेणाचा पुतळा उभारला जातोय.

एप्रिल 2018 मध्ये खुद्द महेशबाबूनेचं याचा खुलासा केला होता. आता महेशबाबूचा हा मेणाचा पुतळा एका दिवसासाठी भारतात येतोय.

मादाम तुसाद संग्रहालयाची शोभा वाढवणारा महेश बाबूचा मेणाचा पुतळा एका दिवसासाठी हैदराबादमध्ये आणला जाणार आहे.

हा पुतळा हैदराबादमधील एएमबी सिनेमा थिएटरमध्ये ठेवण्यात येईल. महेशबाबूचे चाहते या पुतळ्याला पाहू शकतील.

यापूर्वी कुठल्याही भारतीय सेलिब्रिटीचा अशाप्रकारे भारतात आणला गेलेला नाही.

केवळ चाहत्यांच्या आग्रहाखातर पहिल्यांदा मादाम तुसादमधील महेशबाबूचा मेणाचा पुतळा त्याच्या कर्मभूमीत येणार आहे.

यानंतर तो मादाम तुसादच्या मलेशिया येथील संग्रहालयात विराजमान होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *