Sun. Jul 12th, 2020

चिमुकलीच्या बलात्काऱ्यावर पोलीस अधीक्षकांनी झाडल्या गोळ्या

अवघ्या सहा वर्षांच्या मुलीचं अपहरण करून, तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीवर रामपूरचे पोलीस अधीक्षक आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट अजय पाल शर्मा यांनी गोळ्या झाडल्या. या आरोपीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. शर्मा यांच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

नेमकं काय घडलं ?

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एका 6 वर्षांच्या चिमूरडीचं मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अपहरण करण्यात आलं होतं.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अपहरणकर्ता नाज़िल याने चिमूरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती.

चिमूरडीचा मृतदेह सापडल्याने आणखीच खळबळ माजली होती.

पोलीस प्रशासनावरही टीकेची झोड उठली होती.

या खळबळजनक घटनेनंतर पोलीस अधीक्षक अजय पाल शर्मा यांनी नाज़िलला शोधण्यासाठी पथकं तयार केली.

शोधमोहिमेदरम्यान फरार आरोपी नाज़िलचा पत्ता लागला.

पोलीस नाज़िलच्या मागावरच होते.

त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना पोलीस आणि नाज़िलमध्ये चकमक झाली.

या चकमकीत मोठ्या हुशारीने अजय पाल शर्मा यांनी नाज़िलच्या दोन्ही गुडघ्यांवर गोळ्या झाडल्या आणि त्याला अटक केली.

जखमी नाजीलला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीवर गोळ्या झाडल्याबद्दल सोशल मीडियावरून शर्मा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशा प्रकराच्या कारवाईमुळे बलात्काऱ्यांवर वचक बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *