Fri. Jul 30th, 2021

अश्लील चाळ्यांना आता बसणार आळा?

परदेशामध्ये विशेषतः युरोपमधील अनेक देशांमध्ये अश्लीलतेसंदर्भातील संकल्पना आणि नियम भारतापेक्षा वेगळे आहेत. भारतातील गोवा राज्यातच फक्त काही बीचेस असे आहेत, जिथे पूर्णपणे विवस्त्रपणे लोकांना फिरता येतं. परदेशात मात्र असे अनेक बीचेस आहेत. स्पेनमधील ‘मेजोरका’ आणि ‘इबिझा’ हे nude beaches तर जगभरातील पर्यटकांची फेव्हरिट डेस्टिनेशन्स आहे. मात्र लोकांना मिळणाऱ्या नग्नतेच्या स्वातंत्र्याचा आता लोक इतका गैरफायदा घेऊ लागले आहेत, की स्पेन सरकारला अखेर त्यात हस्तक्षेप करण्याची गरज पडली आहे.

काय घडलंय असं ‘या’ बीचेसवर?

‘मेजोरका’ आणि ‘इबिझा’ या बीचेसवर पर्यटकांची अमाप गर्दी असते.

या बीचेसवर नग्न होऊन लोक धिंगाणा घालत असतात.

त्यातच दारू आणि स्मोकिंग यांमुळे बेभान होऊन हे नग्न लोक अश्लील चाळे करू लागतात.

त्यांच्या खुलेआमपणे होणाऱ्या अश्लील वर्तनाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात viral झाले आहेत.

त्यामुळे जगभरात स्पेनची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे.

अशा घटना जरी केवळ 2 बीचेसवरच होत असल्या, तरी संपूर्ण स्पेनमध्येच अशा गोष्टी चालतात की काय, असा गैरसमज जगभरात होतोय.

अनेक देशातून कुटुंबं स्पेनमध्ये पर्यटनासाठी येण्याचं टाळतात.

या सर्व गोष्टींनी स्पेन सरकारही हैराण झालंय.

त्यामुळेच या अश्लील चाळ्यांना आळा घालण्यासाठी स्पेन सरकारने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय.

यासाठी 64 नियमांची यादीदेखील स्पेन सरकारने जारी केली आहे.

या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि प्रशासनावर आहे.

त्यामुळे जो कुणी हे नियम मोडेल, त्यांना कठोर शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

अशा प्रकारे स्पेन आपली अश्लील पर्यटनस्थळाची प्रतिमा पुसून काढणार आहे. भारतातील गोव्यामध्येही अशाच प्रकारची समस्या सरकारसमोर अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे गोव्यामध्येही आपली प्रतिमा सुधारण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेतला जाणार का असा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *