Sun. Sep 22nd, 2019

नवरात्रीतील ‘या’ ट्रेंडिग गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

0Shares

नवरात्रीत गरबा आणि दाडिंया या खेळामुळे अनेक लोकांशी भेटणं होत असतं अशातच आपण कसे दिसत आहोत ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाचीच असते, तसेच तयार होताना आपण ट्रेंडी आणि स्टाइलिश दिसावे असचं आपल्याला वाटते तसेच आपण इतरांपेक्षा स्टाइलिश दिसावे असेही आपल्याला वाटते, मात्र यासाठी आपल्याला नवरात्रीचे लेटेस्ट ट्रेंड माहीत असणही महत्वाचं आहे. तर मग चला जाणून घेऊया की यंदाच्या नवरात्रीत काय ट्रेंडिग आहे.

बॅकलेस कच्छ कढ़ाईवाले ब्लाउज

 • या नवरात्रीत बॅकलेस कच्छ कढ़ाईवाले ब्लाउज ट्रेंडिगमध्ये आहेत.
 • यांना आपण साडी किंवा लहंगे यासह परिधान करु शकता.

पारंपरिक आणि क्लासिक हेयर स्टाइल 

 • या नवरात्रीत पांरपरिक पण क्लासिक लुक वाली हेयर स्टाइल ट्रेंडमध्ये आहे.

टॅटू 

 • बॅकलेस ब्लाउज परिधान केल्यानंतर सध्या पाठ, मान आणि कमरेवर टॅटू काढण्याचा ट्रेंड आहे.
 • तसेच तुम्ही कायमसाठी किंवा तात्पुरता टॅटूही काढू शकता.

वॉटरप्रूफ मेकअप 

 • नवरात्रीत गरबा खेळत असताना घामाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी सध्या वॉटरप्रूफ मेकअप ट्रेंडमध्ये आहे.
 • बिंदिया या नवरात्रीत ड्रेस किंवा साडीवर बिंदिया परिधान करण्याचा ट्रेंड आहे.

बांगड्या आणि कमरपट्टा

 • यंदा मल्टीकलर बांगड्या आणि कमरपट्टा दोन्हीही ट्रेंडमध्ये आहेत.
 • तसेच कमरपट्टा तुम्ही ड्रेस किंवा साडीवरही परिधान करु शकता.

कोल्हापुरी 

 • या नवरात्रीत कोल्हापुरी चप्पल आणि मोजडी तुमच्या ट्रडिशनल कपड्यांसोबत शोभून दिसेल.
 • तसेच यंदा राजस्थानी कोल्हापुरी फुटवेयर ट्रेंडमध्ये आहे
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *