Tue. Dec 7th, 2021

पूरग्रस्तांसाठी घरे, शाळा, रस्ते पुनर्बांधणीसाठी स्पेशल बजेट – पंकजा मुंडे

सध्या या ठिकाणी पाणी, वीज, आणि अन्न देखील मिळत नाहीये. तसेच यानंतर रस्ते, घरे आणि शाळांची दुरवस्था होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पूरग्रस्त सांगली कोल्हापूर मधील घरे, शाळा, रस्ते,पुनर्बांधणी साठी स्पेशल बजेट असेल अशी घोषणा पंकजा मुंडेंनी केली आहे.

गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरला महापूराने विळखा घातला आहे. अनेक गावांत पाणी गेल्याने हजारो लोक पाण्यात अडकले होते. अनेकांची घरे, संसार उद्धवस्त झाले आहेत. आता पाणी ओसरल्यानंतर या लोकांना दैनंदिन गरजांसाठी पायपीट होणार आहे.

सध्या या ठिकाणी पाणी, वीज, आणि अन्न देखील मिळत नाहीये. तसेच यानंतर रस्ते, घरे आणि शाळांची दुरवस्था होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पूरग्रस्त सांगली कोल्हापूर मधील घरे, शाळा, रस्ते,पुनर्बांधणी साठी स्पेशल बजेट असेल अशी घोषणा पंकजा मुंडेंनी केली आहे.

पूरग्रस्तांसाठी स्पेशल बजेट

पूरग्रस्त भागातील घरे, रस्ते, शाळा, अंगणवाडी, यांच्यासाठी स्पेशल बजट देवुन पुन्हा उभा करु अशी घोषणा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. बीड शहरातील शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेत त्या बोलतं होत्या, यावेळी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

दुष्काळग्रस्त भागातील आणि पूरग्रस्त भागातील लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पडली पाहिजे. इथून सांगली कोल्हापूरकडे प्रत्येकाने जाणे योग्य नाही. तिथल्या यंत्रनेवर तणाव येईल असं कुठलंच काम करू नये.

जेव्हा पाणी ओसरेल तेव्हा जास्त गरज भासणार आहे.पाणी ओसरल्यावर तिथल्या संकटांचा सामना करण्यासाठी आपण मदत करणे गरजेच आहे. तिन्ही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांना घरे शाळा, अंगणवाडी , रस्ते, यांच्या नुकसानीचा अहवाल मागितला आहे.त्यांच्या पुनर्बांधणीसाठी स्पेशल बजट देवून नव्याने उभारणी केली जाईल असे पंकजा मुंडेंनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *