Thu. Sep 19th, 2019

रविवारीच सुट्टी का ? जाणून घ्या

28Shares

लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आठवडा संपत आला की वाटत पाहत असतो आपल्या हक्काच्या सुट्टीची अर्थात रविवार म्हणजेच आपला हक्काचा सन्डे… या दिवशी शाळा, कॉलेज, ऑफिसला सुट्टी दिली जाते. अर्थातच हा दिवस शासकीय सुट्टीचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी एखादा स्पेशल प्लॅन करतात, आणि यामुळेच हा दिवस आपल्याल्या आपल्या आवडीनुसार घालवता येतो. अशा या ‘सन्डे’ची प्रत्येकजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. पण आपल्याला ‘सन्डे’लाच सुट्टी का दिली जाते, हा विचार तुम्ही कधी केलाय का ?

चला तर जाणून घेऊया सन्डे म्हणजेच रविवारच सुट्टीचा दिवस का ?

रविवारीच (सन्डे) का असते सुट्टी ?

जेव्हा भारतात ब्रिटीशांचे राज्य होते तेव्हा कामगारांना आठवड्यातील सातही दिवस काम करावं लागत होतं. त्यांना कोणतीही सुट्टी मिळायची नाही.

मात्र ब्रिटीश अधिकारी दर रविवारी प्रार्थनेसाठी चर्चला जात असत, पण कामगारांसाठी अशी कोणतीही परंपंरा नव्हती.

त्यावेळी श्री नारायण मेघाजी लोखंडे हे कामगारांचे प्रमुख नेते होते.

त्यांनी ब्रिटीशांसमोर सुट्टीचा प्रस्ताव मांडला आणि ते म्हणाले की आठवड्याच्या सहा दिवस काम केल्यानंतर आम्हाला देश आणि समाजाच्या सेवेसाठी आठवड्यातील एक हक्काचा दिवस मिळाला पाहिजे यासोबतच ते म्हणाले की रविवार हा वार महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाचा आहे, त्यामुळे हा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून घोषित केला जावा.

मात्र ब्रिटीश अधिकांऱ्यांनी सुरुवातीला त्यांच्या या प्रस्तावाला मान्यता दिली नव्हती. पण नारायण लोखंडे यांनी हार न मानता सलग 7 वर्ष आपला संघर्ष सुरुच ठेवला.

अखेर 10 जून 1890 रोजी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी रविवार हा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून घोषित केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारत सरकारने याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत.

रविवारी सुट्टी देण्यामागचा उद्देश

आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था (ISO) नुसार रविवार हा दिवस आठवड्यातील शेवटचा दिवस असतो. याला 1986 मध्ये लागू करण्यात आले होते.

1844 मध्ये ब्रिटीश गवर्नर जनरलने शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून ठरवला होता.

यामागचा उद्देश असा की या दिवशी मुलांना काही रचनात्मक गोष्टी करता याव्यात आणि स्वत:मध्ये विकास घडवता यावा.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन 1843 मध्ये ब्रिटीशांना सुट्टीचा आदेश देण्यात आला, आणि त्यानंतरच हे भारतात पोहचले.

 

28Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *