Mon. Jan 24th, 2022

जगातला हा एकमेव शिवकालीन गणपती, ज्याच्यासमोर होतं पिंडदान!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तारामुंबरी गावामधील खवळे गणपती हा केवळ जिल्ह्याच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या गणपतीची परंपरा आहे. गेली 319 वर्षं हा गणपती बसतोय.

काय आहे या गणपतीची कथा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुराब जातीच्या जहाजाचा प्रमुख तांडेल असलेला शिव तांडेल यांचा वंश वाढत नव्हता.

शिव तांडेल हे मालवण मधील मालडी गावातील नारायण मंदिरात गणपतीची सेवा करत.

एकदा त्यांच्या स्वप्नात गणपतीने दृष्टान्त दिला.

‘माझा मोठा उत्सव कर तुला पुत्ररत्न होईल’ असं तांडेलांना स्वप्नांत सांगितलं गेलं.

तेव्हा शिव तांडेलांनी छत्रपतींच्या सरदाराला शोभेल, असा 1701 मध्ये उत्सव सुरू केला.

त्याचं फळ त्यांना मिळालं आणि त्यांना पुत्ररत्न झालं.

त्यावेळेपासून या खवळे गणपतीला सुरुवात झाली.

काय आहे या गणपती मूर्तीचं वैशिष्ट्य?

ही मूर्ती नारळी पौर्णीमेला बनवायला सुरुवात करतात.

खवळे कुटुंबातील व्यक्तीच ही मूर्ती बनवतात.

शेतातील साधी माती आणून त्यापासून ही मूर्ती बनवली जाते.

सुमारे दीड टन माती मूर्ती बनवण्यासाठी वापरतात.

ही मूर्ती सुमारे पावणे सहा फुटाची असते.

विशेष म्हणजे गणेश चतुर्थीला या खवळे गणपतीला संपूर्णं अंगाला पांढरा चुना किवा पाढंरा रंग लावून पूजेला बसवतात.

यावेळी मूर्तीचे फक्त डोळे रंगविलेले असतात

जेव्हा मूर्तीची विधिवत पूजा केली जाते, त्यावेळी तेथे गणेशाचं वाहन उंदीर नसतो.

उंदिर दुसऱ्या दिवशी पूजेला बसवतात.

तिसऱ्या दिवसापासून रंगकाम सुरु होतं.

पाचव्या दिवशी अंगाला संपूर्ण लाल रंग दिला जातो.

म्हणून या गणपतीला लाल गणपती असंही म्हणतात.

पाचव्या दिवसापासून सकाळी, संध्याकाळी व रात्री अशी तीनवेळा आरती केल्या जातात.

7 व्या, 11 व्या, 15 व्या, 17 व्या व 20 च्या दिवशी सतत रंगकाम सुरू असतं.

या गणपतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे या गणपतीसमोर चक्क पिंडदान होते. जगातला हा पहिला गणपती आहे, ज्याच्यासमोर अशाप्रकारे पिंडदान होतं. या खवळे गणपतीची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्येही झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *