Tue. Aug 9th, 2022

मुख्यमंत्री शिंदेंची तुफान फटकेबाजी

विधानसभेत आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्षात शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज विधासभेत बहुमत प्रस्ताव जिंकला. बहुमत चाचणीत शिंदे सरकारने बाजी मारली आहे. या निवडणुकीत शिंदे सरकारला १६४ आमदारांचे समर्थन मिळाले. तर भाजपाचे दोन आमदार आजारपणामुळे अनुपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा युती झाली असून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच आम्ही कालही, आजही आणि उद्याही शिवसैनिक आहोत असे प्रतिपादनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी पदाची लालसा केली नाही. तसेच माझं खातं फडणवीसांनी ठरवलं नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिल्याबद्द्ल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच फडणवीस शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदही देणार होते असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मविआत आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच मी पाच वेळा भाजपासोबत चला असे सांगितले होते, मात्र माझे बोलणे ऐकले नाही. मविआत सावरकरांचे समर्थन करू शकलो नाही तर मविआ दाऊदच्या हस्तकांवर कारवाई करू शकली नसल्याचा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी मविआवर लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर नाराजगी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना मला नगरविकास मंत्रीपदाचे खाते देण्यात आले. मात्र, माझ्या विभागात सगळेच हस्तक्षेप करायचे. तर अजित पवारांनी नगरविकास खातं समांतर चालवलं असल्याची टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. तसेच रक्तपात करणार नाही तर मर्यादेपलीकडे सहनही करणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

विधानसभेत मुलं गमावल्याचं दु:ख व्यक्त करताना मुख्यमंत्री शिंदे भावूक झाले. पक्षासाठी रक्ताचं पाणी केले होते. माझं खच्चीकरण सुरु होते. आत्ता माघार घेणार नाही. अन्यायाविरोध न्यायासाठी बंड काढण्यात आला तेव्हा, चर्चेचे साठी बोलावले तर दुसरीकडे माझे पद काढून घेतले. आमचे बाप काढले शिवीगाळ केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा मारला. भाषणावेळी एकनाथ शिंदे आनंद दिघेंच्या आठवणीने भावुक झाले. भाषण करताना त्यांनी शिवसेनेसाठी मी आंदोलन करून करून शिवसेना वाढवली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. या भाषणावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कामाची संधी दिल्याबद्दल आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.