प्रत्येक धर्मांमध्ये मृत्यूनंतर वेगवेगळ्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची परंपरा आहे. प्रत्येक धर्माचे लोक त्यांच्या मान्यतेनुसार मृतदेहाचे अंत्यसंस्कार करतात. हिंदू, शीख, आणि बौद्ध धर्मात मृतदेहाला लाकडावर ठेवून जाळले जातात. एकीकडे, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात मृतदेहाला पुरवले जातात. तर दुसरीकडे, पारशी धर्मात वेगळ्याच पद्धतीने मृतदेहाला अंत्यसंस्कार केले जातात. पारशी धर्मात, मृत्यूनंतर मृतदेह चक्क गिधडांना खाण्यासाठी 'टॉवर ऑफ सायलेन्स'च्या वर ठेवला जातो. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडतो, पारशी धर्मात मृतदेहांना 'टॉवर ऑफ सायलेन्स' वर गिधडांना खाण्यासाठी का ठेवले जातात. चला तर जाणून घेऊया.
अशाप्रकारे, पारशी धर्मात केले जातात अंत्यसंस्कार:
पारशी समाज हा एक पारंपरिक असा झोरोस्ट्रियन धर्मीय समुदाय आहे. पारशी धर्मात त्यांच्यात मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी विशेष पद्धत आहे, जी "डखमा" (Dakhma) किंवा "टॉवर ऑफ सायलेंस" (Tower of Silence) म्हणून ओळखली जाते. ही परंपरा गेल्या हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे आणि झोरोस्ट्रियन धर्माच्या मूलभूत तत्त्वांशी निगडित आहे.
पारशी धर्मात मृतदेहाला न जाळता, गिधाडांना खायला का दिले जातात?
1 - पारशी (झोरोस्ट्रियन) धर्मातील तत्वज्ञान आणि मृत्यूची संकल्पना:
पारशी (झोरोस्ट्रियन) धर्मात अग्नी, पाणी, पृथ्वी आणि हवा या चार मूलभूत तत्त्वांना (Element) अत्यंत पवित्र मानले जाते. या तत्त्वांना कोणत्याही प्रकारे अशुद्ध करणे किंवा प्रदूषित करणे निषिद्ध मानले जाते. पारशी धर्मात, मृतदेहाला मातीमध्ये गाडणे किंवा जाळणे योग्य समजले जात नाही, कारण मृतदेह हा "नसू" म्हणजे अशुद्ध मानला जातो. मृत्यू झाल्यानंतर शरीरात अपवित्रता येते, आणि त्यामुळे मृतदेहाला जमिनीत गाडल्यास माती दूषित होऊ शकते, किंवा जाळल्यास पवित्र अग्नी अपवित्र होऊ शकतो.
हेही वाचा: घरात कुठल्या दिशेला आरसा ठेवावा? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा
2 - 'टॉवर ऑफ सायलेंस' म्हणजे काय?
'टॉवर ऑफ सायलेंस' म्हणजे डखमा (Dakhma), हा एक गोलाकार, खुला दगडी बांधकाम असतो. 'टॉवर ऑफ सायलेंस' जास्त तर डोंगराळ किंवा निर्जन भागात बनवले जातात. या ठिकाणी पारशी समाजातील लोक मृतदेह ठेवतात. या 'टॉवर ऑफ सायलेंस' म्हणजेच डखमाच्या (Dakhma) रचनेत तीन मुख्य वर्तुळे (रिंग्स) असतात:
पुरुषांसाठी, महिलांसाठी आणि मुलांसाठी.
या मृतदेहांना 'टॉवर ऑफ सायलेंस' म्हणजेच डखमामध्ये (Dakhma) ठेवले जातात, जिथे गिधाडे व इतर शिकारी पक्षी त्यांचे अन्न म्हणून सेवन करतात. काही तासांतच मृतदेह पूर्णपणे नष्ट होतो.
3 - पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक प्रक्रिया:
ही पद्धत अत्यंत पर्यावरणपूरक मानली जाते, याचे कारण म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. नैसर्गिकरित्या मृतदेह नष्ट होतो. त्यामुळे, जमिनीत दूषित घटक जाऊन पाणी किंवा माती प्रदूषित होत नाही. एकाप्रकारे, पारशी धर्मात हा शुद्धीकरणाचा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचे मार्ग मानले जातात.
4 - ऐतिहासिक आणि पारंपरिक महत्त्व:
पारशी (झोरोस्ट्रियन) धर्माचा उगम प्राचीन पर्शियामध्ये (आताचे इराण) झाला. तिथेदेखील हीच पद्धत प्रचलित होती. नंतर जेव्हा पारशी भारतात आले, तेव्हा त्यांनी हीच प्रथा सुरू ठेवली. मुंबई आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पारसी समाज आहे, आणि आजही तिथे टॉवर ऑफ सायलेंस कार्यरत आहेत.
5 - आधुनिक काळातील आव्हाने:
आधुनिक काळात गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने (मुख्यतः कीटकनाशकांमुळे) ही प्रथा काही प्रमाणात अडचणीत आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी सौरऊर्जेच्या मदतीने मृतदेह नष्ट करण्याचे उपाय अवलंबले जात आहेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)