आज 15 एप्रिल 2025, मंगळवार, वैदिक पंचांगानुसार फारच महत्त्वाचा मानला जातो. मंगळवाराचा दिवस हनुमानाच्या कृपेला समर्पित असतो. अशा दिवशी शुभ ग्रहयोग घडत असून त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येतोय आहे. चला जाणून घेऊया तुमच्या राशीचं भविष्य...
मेष रास (Aries Horoscope)
आज तुमच्यासाठी दिवस सामान्य आहे पण थोडं सावध राहण्याची गरज आहे. कोणी तुम्हाला फसवू नये याची खबरदारी घ्या. मौल्यवान वस्तू, पैसे जपून ठेवा. व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा.
वृषभ रास (Taurus Horoscope)
कामाची सुरुवात जोशात कराल. परंतु सुरुवातीला आक्रमकपणा न दाखवता शांतपणे विचारपूर्वक निर्णय घ्या. संयम आणि काटेकोर नियोजन यामुळे यश मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
आज तुमची चिकाटी तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. महिलांसाठी हा दिवस अत्यंत सौख्यदायक असून त्यांचा आत्मसन्मान वृद्धिंगत होईल. घरगुती वातावरणही शांत राहील.
कर्क रास (Cancer Horoscope)
आर्थिकदृष्ट्या लाभदायक वेळ आहे. तुमच्या भूमिकेची जाणीव ठेवा आणि तिचे पालन प्रामाणिकपणे करा. कामात एकाग्रता ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
आज तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. महत्त्वाचे निर्णय धाडसाने घेण्याची वेळ आहे. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक बाबतीतही चांगली प्रगती होईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
परदेशाशी संबंधित कामं करत असाल तर आज ती पुढे सरकतील. योग्य कागदपत्रे आणि नियोजनावर भर द्या. योग्य दिशा मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope): घरगुती तणाव जाणवेल
घरामध्ये वातावरण थोडं तापलेलं राहू शकतं. संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. संवाद साधून गैरसमज दूर करावेत.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
आज काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत. समृद्धीची दिशा घेण्याची वेळ आली आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
कोर्ट-कचेऱीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. महिलांनी भावनांवर नियंत्रण ठेवून निर्णय घ्यावेत.
मकर रास (Capricorn Horoscope)
सतत कामात गुंतलेले राहाल, त्यामुळे यश तुमच्या पावलांशी येईल. मेहनतीचे चीज होईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
आज घरातील जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या यशस्वीरीत्या पार पाडाल. महिलांसाठी विशेषतः सौख्यदायक दिवस ठरेल.
मीन रास (Pisces Horoscope)
सरकारी कामात यश मिळेल. जुनी कामं पूर्ण होऊन समाधानदायक फळ मिळेल. नोकरीतही चांगले संकेत आहेत.
(वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)