Sunday, April 20, 2025 05:38:22 AM

हनुमानाचे एकही मंदिर 'या' गावात नाही

आज सर्वत्र हनुमान जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. परंतु जालन्यातील अंबड तालुक्यात जामखेड नावाचे एक गाव आहे. येथे कुठेही हनुमंताचे मंदिर नाही, कुठे फोटोही दिसत नाही.

हनुमानाचे एकही मंदिर या गावात नाही

विजय चिडे, प्रतिनिधी, जालना : आज सर्वत्र हनुमान जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. परंतु जालन्यातील अंबड तालुक्यात जामखेड नावाचे एक गाव आहे. बारा वाड्या, तेरावे जामखेड अशी या भागाची ओळख आहे. या तेरा गावात सुरुवातीपासून कुठेही हनुमंताचे मंदिर नाही, कुठे फोटोही दिसत नाही. या गावातील नागरिक हनुमानाची पूजा, आराधनाही करत नाहीत. कारण या गावातील नागरिकांचा आदिदेव जाम्बुवंत आहे. 

जामखेड येथे गावाच्या उत्तरेला डोंगरावर त्यांचे मंदिर आहे. माळवाडी, भोकरवाडी, ठाकरवाडी, नागोण्याची वाडी, लिंबेवाडी, जोगेश्वरवाडी, नारळाचीवाडी, कोंबडवाडी, विठ्ठलवाडी, पागेरवाडी, ठोकुरवाडी, बक्ष्याची वाडी आणि जामखेड या 13 गावांत हनुमान जयंती अर्थात जन्मोउत्साह साजरा होत नसल्याची परंपरा असल्याचे गावकरी सांगत आहेत. जालना, छत्रपती संभाजीनगरपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर तर जामखेड गावापासून 2 किलोमीटरवर हे मंदिर आहे. त्याला जाम्बुवंत गडी म्हणूनही ओळखले जाते. जाम्बुवंतांची ओळख श्रीरामाचा निस्सिम भक्त अशी आहे. प्रभु राम यांना ते सल्लाही द्यायचे असे, सांगितले जाते. या जाम्बुवंतांनी रावणाला हरवून श्री राम सगळ्यांसोबत वापस आले, तेव्हा रामाने सगळ्यांना काय हवे हे विचारले. तेव्हा जाम्बुवंतांनी मला एकांत असलेली जागा तपश्चर्येसाठी हवी आहे, असे सांगितले. तेव्हा प्रभुरामाने त्यांना हा परिसर दिला अशीही अख्यायिका गावकरी सांगत आहेत.

हेही वाचा : नागपूरच्या शिक्षण विभागातील घोटाळा प्रकरणी दोन दोषींना अटक

या टेकडी निजीक एक प्राचीन गुहेचे अवशेष आजही सापडतात. 1992 च्या सुमारास भक्तांनी लोकवर्गणीतून या मंदिराचा जिर्नोद्धार केला. या मंदिर परिसरात एक गणपतीचे, एक महादेवाचे मंदिर असून मोठा सभा मंडप उभारण्यात आला आहे. त्यानंतर आतल्या भागात गेल्यावर एक गुहेसारखे मंदिर आहे. तेथून वाकून आत गेल्यानंतर तिथे जाम्बुवंतांचे दर्शन होते. जाम्बुवंत महाराजांची आराधना शुक्रवार केली जाते. तसेच महत्वाच्या सणांना येथे भाविकांची गर्दीही असते. येथे यात्राही भरवली जाते. राज्यभरातून तसेच परराज्यातूनही भाविक येथे भक्तिभावाने दर्शनासाठी येतात. हा भाग जाम्बुवंत टेकडी, जाम्बुवंत गुहा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जातो. हजारो वर्षापासून पंचक्रोशितील भाविक आपली पुरातन परंपरा जपत जाम्बुवंत महाराजांची आराधना करत असल्याचं पुजारी क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

जामखेड परिसरातील आराध्य दैवत जांबुवंतच आहेत. त्यांच्या प्रत्येक मंगलकार्याची सुरुवात सर्व गावांमध्ये आजही श्री जांबुवतांच्या दर्शनाने होते. जामखेड पंचक्रोशीत हनुमानाचे एकही मंदिर नाही.येथील गावकरी जांबुवंतांचे भक्त आहेत. जांबुवंतांच्या आशीर्वादानेच कार्य सफल होते अशी भावना गावकऱ्यांची आहे. तसेच जांबुवंत व हनुमान दोघेही श्रीरामांचे भक्त होते. पण जांबुवंत वयाने ज्येष्ठ होते. ते श्रीरामांना, हनुमानालाही सल्ला देत, त्यांचे येथे निवास आहे. त्यामुळे 13 गावांत हनुमानाचे एकही मंदिर नाही असे ग्रामस्थ सांगतात. 


सम्बन्धित सामग्री