Thu. Jul 9th, 2020

CWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सिडनी : भारताच्या महिला संघानं सांघिक टेबलटेनिसमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची सुवर्ण घोडदौड सुरुच आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात जितू रायने सुवर्णपदक पटकावलं आहे, तर ओम मिथरवाल याला कांस्यपदक मिळालं.

भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंग याने 105 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 15 पदकांची कमाई केली आहे. भारताने आतापर्यंत 8 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकाची कमाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *