Mon. Sep 27th, 2021

टोकियो ऑलिम्पिकच्या रणधुमाळीला शुक्रवारपासून प्रारंभ

पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या रणधुमाळीला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. भारतीय खेळाडू इतिहास रचण्यास सज्ज झालेत. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ८ वाजता जपानमध्ये ‘टोकियो ऑलिम्पिक’चा उद्घाटन सोहळा रंगेल. भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि लंडन ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती बॉक्सर एमसी मेरी कोम ऑलम्पिक उद्घाटनवेळी ध्वजवाहक असतील. तर कुस्तीपटू बजरंग पूनिया ८ ऑगस्टला स्पर्धेच्या सांगता कार्यक्रमाला भारताचा ध्वजवाहक असेल. भारताचे शिलेदार ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करतील, हीच आशा देशभरातील चाहते बाळगून आहेत. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ११९ खेळाडूंसह २२८ सदस्यांची तुकडी भारताने पाठविली आहे. या ११९ खेळाडूंपैकी ६७ पुरुष आणि ५२ महिला खेळाडू आहेत. ऑलिम्पिकमधील हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ताफा आहे. भारत यावेळी ८७ स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. ऑलिम्पिक खेळांमध्ये भारत तिरंदाजीने आपली मोहीम सुरु करणार आहे. २०४ देशांच्या ११ हजारांहून अधिक खेळाडूंमध्ये पदकांसाठी चढाओढ रंगणार आहे. देशभरातून खेळांडूवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *