Sunday, March 08, 2026 11:00:29 PM

Sanju Samson Post: 'हे सर्व कष्टाचं...'; संजू सॅमसनने फक्त 5 शब्दांत व्यक्त केल्या भावना; असं काय लिहिलं की, 10 तासांत मिळाल्या लाखो लाईक्स

वेस्ट इंडिजविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात नाबाद 97 धावांची खेळी करत संजूने भारताला 5 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

sanju samson post हे सर्व कष्टाचं संजू सॅमसनने फक्त 5 शब्दांत व्यक्त केल्या भावना असं काय लिहिलं की 10 तासांत मिळाल्या लाखो लाईक्स

Sanju Samson Post:  ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर संजू सॅमसन नावाचं वादळ घोंगावलं आणि टीम इंडियाने दिमाखात टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात नाबाद 97 धावांची खेळी करत संजूने भारताला 5 विकेट्सनी विजय मिळवून दिला. मात्र, या विजयापेक्षाही सध्या चर्चा आहे ती संजूने सामन्यानंतर शेअर केलेल्या अवघ्या '5 शब्दांच्या' पोस्टची!

मैदानावरच गुडघे टेकले आणि बॅटला केलं 'किस'
शेवटच्या षटकात चौकार आणि षटकारांची बरसात करत संजूने भारताचा विजय निश्चित केला. विजय मिळवताच तो प्रचंड भावूक झाला होता. देवाला धन्यवाद देत त्याने मैदानावरच गुडघे टेकले आणि आपल्या बॅटचे चुंबन घेतले. ड्रेसिंग रूममध्येही त्याच्या या खेळीचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले.

काय आहे ती 5 शब्दांची पोस्ट?
आपल्या कारकिर्दीतील कदाचित सर्वात मोठी खेळी खेळल्यानंतर संजूने इंस्टाग्रामवर मैदानावर बसलेला एक फोटो शेअर केला. त्याने कॅप्शनमध्ये फक्त 5 शब्द लिहिले. "It was all worth it" (हे सर्व कष्टाचे फळ आहे) संजूच्या या संघर्षाची जाणीव असलेल्या चाहत्यांनी या पोस्टवर अवघ्या 10 तासांत 40 लाखांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला
या खेळीसह संजूने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.  टी-20 वर्ल्ड कपमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता संजूच्या (97) नावावर आहे. यापूर्वी विराट कोहलीच्या (82) नावावर हा रेकॉर्ड होता. 2010 मध्ये सुरेश रैनाने ठोकलेल्या शतकानंतर, टी-20 वर्ल्ड कपमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

हेही वाचा - IND vs AFG Schedule: भारत-अफगाणिस्तान मालिकेचे वेळापत्रक जाहीर; रोहित-विराटसह शुभमन गिल मैदानात परतणार

विराट-रोहितकडून काय शिकलो?
सामन्यानंतर आपल्या अनुभवाबद्दल बोलताना संजू म्हणाला, "मी 10-12 वर्षे आयपीएल खेळलोय आणि गेल्या दशकभरापासून भारतीय संघाचा भाग आहे. जरी मी जास्त सामने खेळलो नसलो, तरी डगआऊटमध्ये बसून विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांना खेळताना पाहणे, हीच माझ्यासाठी मोठी शिकवण होती. ते कठीण प्रसंगात खेळ कसा संपवतात, हे मी जवळून पाहिलं आणि आज तीच रणनीती माझ्या कामी आली."
 


सम्बन्धित सामग्री