Diogo Jota Passes Away: क्रिडा क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. लिव्हरपूल फुटबॉल क्लबकडून खेळणारा 28 वर्षीय फॉरवर्ड खेळाडू डिएगो जोटा याचा 3 जुलै रोजी एका कार अपघातात मृत्यू झाला. या अपघातात डिएगोचा भाऊ आंद्रे सिल्वाचे देखील निधन झाले. डिएगो जोटाचे लग्न 22 जून रोजी रुथ कार्डोसोशी झाले होते. डिएगोच्या लग्नाला केवळ 10 दिवस झाले होते. या बातमीनंतर डिएगो जोटाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
लॅम्बोर्गिनीचा टायर फुटला -
गार्डिया सिव्हिलने बीबीसी स्पोर्टला सांगितले की, जोटा आणि त्याचा भाऊ गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सुमारे 00:30 वाजता मरण पावले. डिएगो जोटाच्या लॅम्बोर्गिनी कारचा दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना टायर फुटला. त्यानंतर कारला भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की, यात जवळील झाडे जळून खाक झाली.
हेही वाचा -SL vs BAN: खेळाडूंची उडाली धांदल! क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानावर घुसला 7 फूट लांब साप, पहा व्हिडिओ
10 दिवसांपूर्वीचं झाले होते फुटबॉलपटू डिएगो जोटाचे लग्न -
प्राप्त माहितीनुसार, जोटाने गेल्या महिन्यात 22 जून रोजी रुटे कार्डोसोशी लग्न केले होते. त्याने अलीकडेच त्याच्या लग्नाच्या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. गेल्या हंगामात डिएगो जोटाने लिव्हरपूलला प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकण्यास मदत केली होती. तसेच जूनमध्ये झालेल्या नेशन्स लीगच्या अंतिम फेरीत पोर्तुगालला स्पेनवर विजय मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हेही वाचा - क्रिकेटपटू शमीला उच्च न्यायालयाचा दणका; पत्नी आणि मुलीला दरमहा 4 लाख देण्याचे आदेश
दरम्यान, पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशन (एफपीटी) चे प्रमुख पेड्रो प्रोएन्का यांनी या बातमीवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशन आणि संपूर्ण पोर्तुगीज फुटबॉल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. जवळजवळ 50 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा एक अद्भुत खेळाडू डिएगो जोटा हा एक असाधारण व्यक्ती होता, ज्याचा सर्व सहकारी आणि विरोधक आदर करत असत. तो समाजासाठी एक आदर्श होता.